Breaking news

टाळ मृदुंगाच्या गजरात देहूच्या मुख्य मंदिरात अश्वाचे रिंगण पार


परंपरा खंडित न करता मुख्य मंदिरात पार पडला रिंगण सोहळा

देहूगाव : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पायी वारी सोहळा यावर्षी कोरोनामुळे होत नसला तरी रीती प्रमाणे सर्व रिवाज केले जात आहेत. पालखी प्रस्थान झाल्या नंतर आजच्या दिवशी पालखी ही बेलवंडी  येथे असते. यावेळी पालखी ला अश्वाचे रिंगण होत असते. मात्र प्रस्थान सोहळा झाल्या नंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथेच ठेवण्यात आली. परंपरेनुसार देहू मधील मुख्य मंदिरातच पालखी बाहेर घेऊन मंदिर प्रांगणात अश्वाचे रिंगण पार पडले.

        यावेळी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये हे रिंगण करण्यात आले. देहूगाव मधील अनगड शहावली बाबा यांच्या ह्या मानाच्या अश्वाला आजच्या संत तुकाराम महाराजांच्या गोल रिंगणाचा मान मिळाला. पहिल्यांदाच ह्या अश्वाला हा मान मिळाला असून अश्वाचे मालक गणेश चव्हाण यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी टाळ मृदुंगाच्या आणि विठू माऊलीच्या गजरात अवघा देहू परिसर दुमदुमून गेला होता.

इतर बातम्या