भाजे येथील यमुनाबाई पदमुले यांचे निधन

कार्ला (प्रतिनिधी) : भाजे मावळ येथील आदर्श माता यमुनाबाई दामू पदमुले यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले. त्या 82 वर्षाच्या होत्या.
भाजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व आदर्श शेतकरी नंदकुमार दामू पदमुले यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंड असा मोठा परिवार आहे.
मावळ माझा परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली