Breaking news

साते मावळ येथील पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीत जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा

लोणावळा : पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीच्या (साते मावळ) फार्मसी विभागाच्या वतीने २५ सप्टेंबर २०२६ रोजी 'जागतिक फार्मासिस्ट दिवस' अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने फार्मसी विभागामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध शैक्षणिक व जनजागृतीपर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमांतर्गत पोस्टर मेकिंग, ई-लीफलेट आणि स्लोगन मेकिंग (घोषवाक्य स्पर्धा) अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त आणि मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. केवळ स्पर्धांपुरते मर्यादित न राहता, युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात भव्य जनजागृती फेरी काढण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी पथनाट्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या पथनाट्याद्वारे प्रतिजैविकांचा (अँटीबायोटिक्स) व औषधांचा योग्य वापर कसा करावा आणि यामध्ये एक फार्मासिस्ट म्हणून समाजाप्रती असणारी जबाबदारी किती महत्त्वाची आहे, हे अतिशय प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले.

या संपूर्ण उपक्रमाच्या नियोजनासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (PCET) सर्व विश्वस्त, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे, कुलसचिव डॉ. अनिल माहेश्वरी आणि शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. अनिल पवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व आवश्यक ती सर्व संसाधने उपलब्ध करून दिली.

फार्मसी विभागाचे अधिष्ठाता डॉ. राजेश पाटील यांनी कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या यशस्वी आयोजनामागे प्रा. मयुरेश राऊत, डॉ. सागर कोरे, प्रा. दीक्षा चासकर, डॉ. श्रीनिवास पाटील, प्रा. राहुल जाधव, प्रा. दिपाली व्हनकडे, प्रा. महेश खुडे, प्रा. महादेवन स्वामी आणि प्रा. राजेश्वरी पाटील यांचे नियोजन व परिश्रम कारणीभूत ठरले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या पेशाबद्दल अभिमान आणि सामाजिक भान वृद्धिंगत होण्यास मदत झाली.

इतर बातम्या