Breaking news

Maval News | धामण जातीच्या सापास जीवदान देण्यात वन्यजीव रक्षक संस्थेला यश

लोणावळा : धामण जातीच्या सापाला जीवदान देण्यात वन्यजीव रक्षक संस्था मावळ यांना यश आले आहे. तळेगाव येथील इंद्रायणी मंगल कार्यालयात साप असल्याचे नगरसेवक संदीप शेळके यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना फोन द्वारे कळविले. इंद्रायणी मंगल कार्यालयात आज लग्न आहे व किचन जवळ एक साप आहे असा त्यांचा फोन आल्यानंतर त्यांनी संस्थेचे सदस्य भास्कर माळी व संकेत मराठे यांना फोन करून यांची माहिती दिली. तसेच लगेचच जाऊन साप पकडायला सांगीतले. ते दोघे ही लगेचच पोचले पहाताय तर ती धामन होती व ती सुस्त पडलेली होती. कारण तिच्या पोटामध्ये एक प्लास्टिक पाईपचा तुकडा गुतलेला होता. बरेच दिवसापासून तो पोटात असल्याने तिला काही खाता पण येत नव्हते व श्वास घ्यायला त्रास होत होता. सर्प मित्रांनी पाईपचा तुकडा थोडा कापून व व्यवस्थित रित्या हळूहळू बाहेर काढला व तिला थोडे पाणी पाजून व्यवस्थित मोकळे केले व थोड्यावेळाने तिला सोडून देण्यात आले. कुठेही वन्यप्राणी आढळल्यास वन्यजीव रक्षक मावळ संस्थे शी संपर्क 9822555004 या क्रमांकावर संपर्क अथवा वन विभागाला 1926 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वन्य जीव रक्षक संस्था मावळ यांनी केले आहे.

इतर बातम्या

महागाई व बेरोजगारीने त्रस्त झालेले सर्वसामान्य नागरिक आपल्याला मतदान करणार नाही याची खात्री पटल्याने भाजपाने राज्यात सर्वत्र फोडाफोडीचे राजकारण केले - निखिल कवीश्वर