Breaking news

Maval Loksabha Election | पवनानगर भागात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

लोणावळा : मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ पवनानगर परिसरामध्ये सोमवारी (19 एप्रिल) करण्यात आला. पवनानगर चौकातील गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये नारळ वाढवत या प्रचाराचा शुभारंभ काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ, शिवसेना मावळ तालुका संघटक अमित कुंभार, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष जयश्री पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य किसन कदम, सरपंच किरण बेनगुडे, आनंता निंबळे, सोसायटीचे माजी चेअरमन आनंदा तुपे, माजी सरपंच भरत दळवी, सोमनाथ कालेकर, कालेगाव चे उपसरपंच भालेराव, युवक काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष कौस्तुभ ढमाले, मावळ तालुका युवक उपाध्यक्ष अनिकेत परिठे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

        काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ यांच्या हस्ते गणपतीची पूजन करून प्रचार सुरुवात करण्यात आला. यावेळी मोहोळ यांच्यासह अमित कुंभार, किरण बेनगुडे, जयश्री पवार, अनिल भालेराव, युवक अध्यक्ष राजेश वाघुले यांनी आपली मनोगत व्यक्त केली.

     पवन मावळातील कोणताही प्रश्न मागील दहा वर्षात सोडवण्यात आला आहे. शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिक यांना खासदार देखील माहीत नाही. कोणतीही विकासकामे नाही, कोणाच्याही सुख दुःखात कधी सहभागी झाले नाहीत. जल वाहिनीचा प्रश्न आजुन तसा धूळखात पडला आहे. धरणग्रस्तांच्या जागेचा विषय सुटलेला नाही, टेन्ट व्यवसायांचे प्रश्न सुटलेले नाहीत. पवन मावळचा परिसर पर्यटकांना खुणावत असताना येते पर्यटन विकासाची कोणतीही कामे झालेली नाहीत. सर्व स्तरावर खासदार बारणे हे मावळ तालुक्यात विकास साधण्यात अपयशी ठरले असल्याने यावेळी शहरी भाग असो वा ग्रामीण भाग सर्वांनी मावळ लोकसभेत बदल करण्याचे ठरविले आहे.    

        महिला, युवक, ज्येष्ठ कोणाचेच प्रश्न न सुटल्याने सर्वांच्याच मनात एक नकारात्मक भावना निर्माण झाली असून प्रचाराच्या वेळी नागरिकांच्या बोलक्या प्रतिक्रिया याची पृष्टी देत आहेत. आम्हाला केवळ बोलणारा नाही तर काम करणारा खासदार हवा आहे, सर्वसामान्य नागरिकांच्या सुख - दुःखात सहभागी होणारा मावळ तालुक्याच्या विकासाला प्राधान्य देणारा खासदार हवा असल्याचे मतदार सांगत आहेत. मावळ लोकसभेची ही निवडणूक सर्वसामान्य मतदारांनी हातात घेतली आहे, त्यामुळे आता कोणी कितीही भुलथापा मारण्याचा प्रयत्न केला तरी मागील दहा वर्षात काय विकास केला ते सांगा मंगच मत मागा असे मतदार स्पष्टपणे सांगत आहेत. 

इतर बातम्या