Breaking news

Maval News | संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीचा आंदर मावळात मेळावा संपन्न

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीने मावळात मेळाव्याचा सपाटा लावला आहे. कामशेत व पवनानगर पाठोपाठ आज आंदर मावळातील अष्टविनायक मंगल कार्यालयात मेळावा पार पडला. मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागावर सहकार महर्षी माऊली दाभाडे यांची चांगली पकड आहे. त्यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे मशाल हे निवडणूक चिन्ह मावळ तालुक्याच्या घराघरात पोहचवण्यासाठी कंबर कसली आहे.

          वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून माऊली दाभाडे व त्यांचे सहकारी यांनी मावळात विभाग निहाय मेळावे लावत समर्थक कार्यकर्ते व ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिक यांच्याशी संवाद साधत इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना मतदान करण्याचे आवाहन करत आहे. मागील दहा वर्षात तुमच्या भागात केंद्र शासनाच्या माध्यमातून किती व कोणती विकास कामे झाली आहेत, याबाबत नागरिकांना विचारणा करत निष्क्रिय खासदाराला आता घरी बसवा व काम करणाऱ्याला संधी द्या असे आवाहन माऊली दाभाडे मावळातील जनतेला करत आहेत. सलग दहा वर्ष मावळातील जनतेने ज्यांना विश्वासाने लोकसभेत पाठवले त्यांनी मात्र येथील जनतेचा विश्वासघात केला आहे. कोणतीही विकासाची कामे केली नाहीत, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविले नाहीत. जनता आता त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. गावोगावी जनतेच्या मनातील खदखद येत्या 13 मे रोजी मतदान पेटीतून व्यक्त होईल असा विश्वास देखील माऊली दाभाडे यांनी व्यक्त केला आहे.

     यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संघटक माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस निखिल कवीश्वर, माजी नगराध्यक्ष राजू गवळी, माजी नगराध्यक्ष सुरेश भाऊ चौधरी, शिवसेना उप जिल्हा प्रमुख भारत ठाकूर, पैलवान संभाजी राक्षे, रमेश भुरुक, शांताराम लष्करी, विलास मालपुटे, पुणे जिल्हा गुरव समाज अध्यक्ष शंकर शिर्के यांनी देखील मनोगते व्यक्त करत महायुतीचे फोडाफोडीचे राजकारण व खासदार बारणे यांनी निष्क्रियता यावर ताशेरे ओढले. आंदर मावळातील मेळाव्याला शेतकरी बांधव व महा आघाडी चे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या