Breaking news

Varsoli News : वरसोली ग्रामपंचायतीच्या वतीने अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन महिलांचा सन्मान

लोणावळा : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त वरसोली ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पंधराव्या वित्त आयोगातून शंभर महिलांना आरोग्य किटचे वाटप करण्यात आले.

     वरसोली गावचे लोकनियुक्त सरपंच संजय खांडेभरड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपसरपंच नलिनी दत्ता खांडेभराड, ग्रामविकास अधिकारी दिपक सिरसाट, ग्रामपंचायत सदस्य रजनी राजू कुटे, नारायण कुटे, मीना पांडू शिंदे, अरविंद बालगुडे, सीता ठोंबरे, राहुल सुतार, विजय महाडिक, दत्ता खांडेभराड, मंदा पाटेकर, माजी सरपंच सारिकाताई खांडेभरड ग्रामपंचायत लेखनिक दामा होले, नम्रता साळवे, राजू कुटे व इतर कर्मचारी उपस्थित होते. कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे प्रतिनिधी बापू माने यांच्या मार्फत महिलांसाठी ब्युटी पार्लर व परसबाग याबाबत दोन दिवसीय कार्यशाळा आयोजन करून सर्व महिलांना संस्थेमार्फत आज रोजी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. गावातील महिलांना स्वंयरोजगार उपलब्ध व्हावा व त्या स्वतःच्या पायावर उभ्या रहाव्यात याकरिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

इतर बातम्या