Breaking news

Kapil Patil : केंद्रिय मंत्री कपिल पाटील यांनी घेतले आई एकविरेचे दर्शन

लोणावळा : एकवीरा देवीच्या गडावर देवीचे दर्शनासाठी आज केंद्रीय मंत्री कपिल पाटील तसेच ठाणे जिल्हा बॅंकेचे संचालक प्रशांत पाटील, ठाणे जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील आले होते.

    नवरात्र उत्सवानिमित्त एकविरा देवीच्या गडावर दर्शनासाठी भाविकांनी दैनंदिन गर्दी होत आहे. आज देखील गडावर भाविकांच्या रांगा आहेत.

    कपिल पाटील व इतरांनी देवीची मनोभावे पुजन करून दर्शन घेतले. याप्रसंगी ग्रामपंचायत वेहेरगाव दहीवली तसेच पुजारी व देवस्थान च्या वतीने देवीचा प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.

    यावेळी भाजपा प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, वेहेरगाव उपसरपंच काजल पडवळ पोलीस पाटील अनिल पडवळ, भाजप तालुका महीला अध्यक्षा सायली बोत्रे, मोरेश्वर पडवळ, नवनाथ पडवळ, सदाशिव देशमुख, मंगेश देशमुख, सचिन देशमुख, काळूराम देशमुख, नवनाथ देशमुख ,एकनाथ गायकवाड, निवृत्ती बोत्रे, संदीप देवकर, पप्पू देवकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल गायकवाड, शंकर बोरकर, वसंतराव माने, संजय देवकर, अशोक पडवळ, संतोष देवकर, एकवीरा देवस्थान व्यवस्थापक मंगेश गायकवाड, बाळासाहेब पडवळ व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा महिला आघाडीच्या वतीने सर्व मान्यवरांना सन्मान करण्यात आला.

इतर बातम्या