Breaking news

लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ इंदोर एक्सप्रेसचे दोन डब्बे रुळावरून घसरले

लोणावळा : इंदोर दौंड एक्सप्रेसचे दोन डबे लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ घसरल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा काही काळ विस्कळित झाली होती. हा प्रकार आज सोमवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास घडला आहे. खंडाळा घाट चढण्यासाठी रेल्वे गाडीला मागील बाजुला इंजिन लावण्यात येते. त्या इंजिनचा व पुढील इंजिनच्या वेगात फरक झाल्याने ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

    रेल्वे प्रशासनाकडून घसरलेले डबे पुन्हा रूळावर आणण्याचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले. नादुरुस्त झालेले दोन डब्बे काढून त्यामधील प्रवासी इतर डब्ब्यांमध्ये बसवत इंदोर एक्सप्रेस पुढे सोडण्यात आली. तर नादुरुस्त झालेल्या डब्ब्यांपैकी पहिला डब्बा 10.25 वाजता दुरुस्त करत शेड मध्ये घेण्यात आला. तर दुसरा डब्बा 11.44 वाजता शेडमध्ये घेण्यात आला. 

   सकाळच्या सत्रात मुंबईकडून येणार्‍या काही गाड्या मंकीहिल व खोपोली स्थानकात थांबविण्यात आल्यानंतर नंतर त्या सोडण्यात आल्या. डब्बे बाजुला काढल्यानंतर क्रॅक झालेले रेल्वे रुळ बदलण्याचे काम युद्धपातळीवर रेल्वे विभागाने हाती घेतले होते. दरम्यान मुंबईकडून येणार्‍या रेल्वे गाड्या मधल्या मार्गींकेवरून पुण्याकडे सोडण्यात आल्या असल्याचे स्टेशन मास्तर आर.पी.सिंग यांनी सांगितले. रेल्वे रुळ बदल्याने काम युद्धपातळीवर करण्यात आले असून दुपारी मार्गीका दुरुस्त करण्यात आली. सुदैवाने ही घटना रेल्वे स्थानकावर घडल्याने गाडीचा वेग अत्यंत कमी होता. यामुळे मोठी दुर्घटना टळली. सकाळी 8.20 ची लोकल यामध्ये रद्द करत लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात आल्या.

इतर बातम्या