शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पूर्व विदर्भातील संपर्क प्रमुखांची बैठक संपन्न

मुंबई : शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शिवालय या ठिकाणी पूर्व विदर्भातील जिल्हा संपर्कप्रमुख व विधानसभा संपर्कप्रमुखांची महत्वपूर्ण बैठक काल पार पडली. या बैठकीला पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ व शिवसेना पूर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पूर्व विदर्भातील 18 विधानसभा शिवसेना लढवेल असा ठाम निर्धार शिवसेना संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांनी बोलून दाखवला. त्याचप्रमाणे लोकसभेसाठी ही जास्तीत जास्त जागा पूर्व विदर्भातून निवडून आणण्याची तयारी करा अशा सूचना त्यांनी सर्व पूर्व विदर्भातील संपर्कप्रमुखांना केले आहे. बैठकी मध्ये पूर्व विदर्भातील पक्ष संघटना कामकाज व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला.