Breaking news

Lonavala News : लोणावळा धरणातील मठात कानिफनाथ महाराजांचा उत्सव आनंदात साजरा

लोणावळा : रंगपंचमीच्या निमित्त सालाबादप्रमाणे लोणावळा शहरातील टाटा धरणात असलेल्या कानिफनाथ महाराजांच्या मठात महाराजांचा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला. दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथ महाराजांचा उत्सव भुशी गावातील सामाजिक कार्यकर्ते मोतीराम मराठे, माजी नगरसेवक माणिक मराठे, रतन मराठे व त्यांचा परिवार साजरा करत असतात. लोणावळा शहर व पंचक्रोशीतून आलेल्या हजारो भाविकांनी याठिकाणी कानिफनाथ महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी मंदिरात महाराजांचा अभिषेक, होम, सत्यनारायण पुजा हे धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता आरती करण्यात आली. यानंतर आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मंदिराच्या परिसरात हिरवीगार झाडी असल्याने आलेल्या भाविकांना मठाच्या परिसरात निसर्गाचा आनंद घेतला. मठाच्या परिसरात मराठे परिवाराकडून स्वच्छता करण्यात आली होती तसेच मंदिराला देखील रंगरंगोटी करण्यात आली होती.

इतर बातम्या