Breaking news

Lonavala Heavy Rain l लोणावळा शहरात आभाळ फाटले l पाच जुलै रोजी 24 तासात 625 मिमी पावसाची नोंद; संपूर्ण शहराला पाण्याचा विळखा

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये पाच जुलै रोजी आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस पडत आहे 24 तासांमध्ये लोणावळा शहरात तब्बल 625 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. यापैकी 450 मिमी हा रविवारी रात्री ते सोमवारी पहाटे दरम्यान झाल्यामुळे लोणावळा शहराची पहाट उजाडली ती पाण्याच्या विळख्याने. संपूर्ण लोणावळा शहरामध्ये पाणीच पाणी झाली आहे सर्व रस्ते पाण्याखाली गेली असून अनेक घरांमध्ये सोसायट्यांमध्ये पाणी घुसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. मुसळधार कोसळणाऱ्या या पावसामुळे लोणावळा शहराचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. टाटा धरण पूर्ण भरल्या असून त्याचे पाणी देखील भिंतीवरून लोणावळा शहरामध्ये येत आहे. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून नदीपात्रातील पाणी हे आजूबाजूच्या परिसरामध्ये घोषणास सुरुवात झाली आहे. निसर्गाचा खूप झाल्याप्रमाणे लोणावळा शहरांमध्ये कोसळधार पाऊस सुरू आहे. मागील आठ दिवसापासून लोणावळा शहरामध्ये सातत्याने पाऊस सुरू असून मागील 72 तासापासून लोणावळा शहरामध्ये अतिवृष्टी सुरू आहे. 

      आज सोमवारी पहाटेपासून लोणावळा शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्व परिसर जलमय झाला असल्यामुळे शाळांना देखील सुट्ट्या देण्यात आले आहेत अनेक रेल्वे गाड्या ट्रॅकवर पाणी असल्यामुळे थांबवण्यात आले आहेत. नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

इतर बातम्या

राजमाचीकडे जाणाऱ्या पर्यटकांनो सावधान ! राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कातळधार जवळ दरड कोसळली; राजमाची कडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद, अनेक पर्यटक अडकले