Breaking news

मावळात लसीकरण मोहिमेला ब्रेक; गुरुवारी सलग पाचव्या दिवशी लसीकरण राहणार बंद

वडगाव मावळ : लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने मावळ तालुक्यातील लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. लस उपलब्ध न झाल्याने मावळातील लसीकरण केंद्र गुरुवारी (22 जुलै) रोजी सलग पाचव्या दिवशी बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

    रविवारी सार्वजनिक सुट्टी मुळे लसीकरण केंद्र बंद होती. तर सोमवार पासून लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली आहेत. एकीकडे कोरोनाचे सावट व दुसरीकडे लसीचा तुटवडा यामुळे नागरिक पेचात सापडले आहेत. शासनाने लवकरात लवकर लस उपलब्ध करून लसीकरण पुन्हा नियमित सुरु करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

इतर बातम्या