मोठी बातमी l मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील देवदूत यंत्रणेचा अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या हस्ते सन्मान

मावळ माझा न्युज नेटवर्क : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तातडीची सेवा पूर्वत अपघातग्रस्तांसाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरलेल्या देवदूत यंत्रणेचा 31 जानेवारी रोजी महामार्गाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुरेश कुमार मेकला यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र यांच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पहिल्या दिवसापासूनच अपघातांची मालिका सुरू आहे हे अपघात रोखण्यासोबतच अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीची सेवा उपलब्ध व्हावी महामार्गावर वाहने गरम होऊन जळण्याच्या अनेक घटना घडत आहेत. आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवणे तसेच अपघात ग्रस्त वाहनांमधून जखमींना तातडीने बाहेर काढत पुढील उपचारासाठी रवाना करणे याकरिता 2015 साली मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर देवदूत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेली काही वाहने व त्याकरता प्रशिक्षित असा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला.
मागील दहा वर्षांमध्ये या यंत्रणेने अविश्वसनीय कामगिरी करत जवळपास 12000 पेक्षा अधिक कॉल अटेंड करत हजारो जणांचे प्राण वाचवून त्यांना जीवदान दिले आहे. राज्यभरात सर्वत्र रस्ता सुरक्षा अभियान सुरू असताना या जीवदूतांचा देवदूतांचा सन्मान व्हावा या हेतूने सदर सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महामार्ग पोलीस चे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉक्टर सुरेश कुमार मेकला यांच्या हस्ते या संपूर्ण देवदूत टीमचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपेंद्र पाटील (मॅनेजर- MSRDC-QRV) व देवदूत पथक हे उपस्थित होते.
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील क्विक सेवा देणारी यंत्रणा म्हणून देवदूत यंत्रणेकडे पाहिले जाते. मागील दहा वर्षापासून ते मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सेवा देत आहेत अपघात घडल्याची घटना घडल्यानंतर व माहिती समजल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्ये ही टीम घटनास्थळी रवाना होत अपघातग्रस्त व्यक्तींना वाहनांमधून बाहेर काढत पुढील उपचारासाठी रवाना करत त्यांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात.