Breaking news

वेहेरगाव येथील सुरेश गायकवाड यांनी बनविला बैलगाडीचा आकर्षक देखावा

लोणावळा : वेहेरगाव येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक व शिवसेनेचे मावळ तालुका संघटक सुरेश हुकाजी गायकवाड यांच्या घरी गणपती बाप्पा व गौराईचे आगमन झाले आहे. 

  त्यांनी यावर्षी त्यांच्या फायनल सम्राट चार बैलांची हुबेहुब प्रतिकृती साकारत दोन बैलगाड्यांचा आकर्षक देखावा तयार करत राज्यात बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू होऊ दे असा संदेश दिला आहे. तसेच गौराईची देखील आकर्षक सजावट केली आहे. एक गौराई झोक्यावर खेळताना तर दुसरी दळण दळताना असा देखावा सादर केला आहे.

इतर बातम्या