Lonavala News l बुलेट गाडीच्या सायलेन्सर मधून फटाके फोडणाऱ्यांचे लोणावळा पोलिसांनी सायलेन्सरच केले जप्त
लोणावळा : बुलेट गाडीच्या सायलेन्सर मधून फटाके फोडणाऱ्यांचे लोणावळा पोलिसांनी सायलेन्सरत जप्त केले आहे. दोन दिवसांपूर्वी लोणावळा शहरामध्ये होतो पोलिसांकडून बुलेट गाड्यांची तसेच कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ज्या गाड्यांच्या सायलेन्सर मधून फटाक्यांसारखे आवाज निघत होते अशा बुलेट गाड्यांचे सायलेन्सर पोलीस साठी जप्त केले आहे.
मागील काही काळापासून लोणावळा वाहतूक पोलीस सातत्याने बुलेट गाड्यांचे सायलेन्सर जप्त करत आहेत. एक वेळ जप्त केलेले सर्व सायलेन्सर हे रोड रोलर खाली घालत त्यांचा चुराडा करण्यात आला होता. वारंवार पोलिसांकडून कारवाई केली जात असताना देखील तरुणाई मात्र सुधारण्याचे नाव घेत नाही. पुन्हा पुन्हा वाहनांना मॉडिफाइड केलेले सायलेन्सर बसवले जात आहेत तसेच त्यामधून कर्णकर्कश आवाज व फटाके फोडले जात आहेत. बाजारभागामध्ये तसेच शाळा परिसरांमध्ये अनेक तरुण अशी मॉडिफाइड केली वाहने घेऊन जात त्या ठिकाणी स्टंटबाजी करत असल्याचे अनेक प्रकार निदर्शनास आले आहेत. लोणावळा पोलिसांनी या पुढील काळात देखील सायलेन्सर मधून फटाके फोडणाऱ्या वाहनांवर नजर ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. लोणावळा शहर वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार अनिल शिंदे व वाहतूक कर्मचारी तसेच वार्डन यांनी ही कारवाई केली आहे.






















