Breaking news

लोणावळ्याचा महागायक; साक्षी देशमाने, गुरुप्रसाद वासकर, शशिकांत भोसले बनले लोणावळ्याचे महागायक

लोणावळा : आधार फाऊंडेशन लोणावळा यांनी आयोजित केलेल्या कोण होणार लोणावळ्याचा महागायक या गायन स्पर्धेत अनुक्रमे 20 वर्षाखालील गटात साक्षी देशमाने, 50 वर्षावरील गटात गुरुप्रसाद वासकर व 20 ते 50 वयोगटात शशिकांत भोसले यांनी महागायक होण्याचा बहुमान मिळविला. अँड बापुसाहेब भोंडव हायस्कूल मध्ये स्पर्धेची महाअंतिम फेरी पाडली.

      आधार फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रथम फेरीत 105 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामधून निवड झालेले 51 जण दुसर्‍या फेरीत गेले व त्यामधून 19 जणांची तिसर्‍या म्हणजेच महाअंतिम फेरीसाठी निवड झाली होती. या महाअंतिम फेरीचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिवसेनेचे माजी पुणे जिल्हाप्रमुख व जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे, आधार फाऊंडेशनचे संस्थापक प्रकाश पाठारे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडूरंग तिखे, स्पर्धेचे आयोजक प्रदिप वाडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल गायकवाड, धीरूभाई कल्याणजी, मारुती साठे, संजय अडसूळे, योगिता कोकरे, अंजना कडू, हर्षल होगले, जितेंद्र कल्याणजी, सुजाता मेहता, उमा मेहता, राजेश मेहता, संजय गोळपकर, सचिन पारेख, वसुधा पाटील, गोरख चौधरी, कांताराम दळवी, संभाजी पडवळ, बबन फाटक, सदाशिव आंबेकर, डॉ विकास नय्यर, रंगनाथ वरे, विशाल पाठारे, मनिषा भांगरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

स्पर्धेचा निकाल : छोटा गट

साक्षी देशमाने - छोटी महागायिका व झरा खान - उपविजेती, उत्तजनार्थ - पार्थ खंडागळे, गंधाक्ष नाईक, आर्या बांदल.

50 वयोगटावरील गट - गुरुप्रसाद वासकर - महागायक व मंगला राणे - उपविजेती, उत्तेजनार्थ - संध्या अडसूळे, नितीन कल्याण, राजू जगताप, प्रशांत नाईक.

20 ते 50 वयोगट - शशिकांत भोसले - महागायक व निलेश सोनवणे - उपविजेता, उत्तेजनार्थ - किरण कुलकर्णी, अमोल वाडेकर, दमयंती महामुनी, दीपाली कांबळे, संतोषी तोंडे, सिद्धार्थ कांबळे

    या स्पर्धेचे परिक्षण डाॅ. अश्विनी रानडे, अनिकेत जवळकर, मिनाक्षी गायकवाड, रेश्मा गित यांनी केले. तर सुत्रसंचालन व निवेदन कोण होणार लोणावळ्याचा महागायक या स्पर्धेचे आयोजक प्रदीप वाडेकर यांनी केले तर आधार फाउंडेशनचे संस्थापक व कोण होणार लोणावळ्याचा महागायक या स्पर्धेचे आयोजक प्रकाश पाठारे यांनी सर्वांचे आभार मानले. माजी नगरसेवक देविदास कडू यांनी स्पर्धेसाठी स्मृतीचिन्ह प्रायोजित केले होते. महागायकांना प्रत्येकी 10 हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देण्यात आले तर उपविजेत्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देण्यात आले. स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व गायक हे नवखे होते. लोणावळा शहरातील नवोदित गायकांना आधार फाउंडेशनच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ निर्माण करुन देण्यात आले होते. सदरची स्पर्धा पाहण्यासाठी लोणावळाकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आधार फाउंडेशनचे सर्व सदस्य व ज्येष्ठ नागरिकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यावेळी बोलताना प्रकाश पाठारे यांनी येत्या काळात तालुकास्तरावरील स्पर्धा घेण्याचा तसेच इतर सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.

इतर बातम्या