Breaking news

सचिन आहिर यांनी घेतली लोणावळा शिवसेना प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांची भेट

लोणावळा : आगामी लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहिर यांनी नुकतीच शिवसेना लोणावळा शहर संपर्क कार्यालयास भेट देत, शहरातील प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक यांच्याशी पक्षसंघटना बांधणीसंदर्भात व आगामी लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.

     या बैठकीस शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे,  मावळ तालुका प्रमुख राजुभाऊ खांडभोर, महिला आघाडी पुणे जिल्हा सहसंपर्क संघटिका शादान चौधरी,  उपतालुकाप्रुख आशिष ठोंबरे, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, समन्वयक जयवंत दळवी, उपशहरप्रमुख संजय भोईर, मनेष पवार, नगरसेवक माणिक मराठे, नगरसेवक शिवदास पिल्लै, युवासेना तालुका अधिकारी शाम सुतार, युवासेना शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी, नगरसेविका सिंधू परदेशी, महिला आघाडी उपतालुका संघटिका संगिता कंधारे, सहसंघटिक मनिषा भांगरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या