निधनवार्ता l विख्यात मार्गदर्शक प्राध्यापक आर. एन. पाटील यांचे निधन

मावळ माझा न्युज नेटवर्क : विख्यात मार्गदर्शक, तत्त्वज्ञ, सर्व भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे प्राध्यापक आर. एन. पाटील यांचे नुकतेच 10 फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी सेवा केली.
प्राध्यापक पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात भौतिकशास्त्र क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि विभागाच्या शैक्षणिक आणि संशोधन उपक्रमांच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावली. मटेरियल सायन्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी, स्पेस फिजिक्स, एनर्जी स्टडीज, फेरोईलेक्ट्रीक्स, फेराईट्स या संशोधन प्रयोगशाळांनी त्यांच्या कार्यकाळात भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. भौतिकशास्त्र विभागातील अनेक शिक्षक त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. केलेल्या आहेत. त्यामुळे प्रा. आर. एन. पाटील सर्व शिक्षकांचे ‘सर’ होते. त्यांनी फक्त प्रा. एस. एच. चव्हाण, प्रा. एस. आर. सावंत, प्रा. एम. बी. डोंगरे, प्रा. बी. के. चौगुले, प्रा. खासबारदार, दिवंगत प्रा. एस. ए. पाटील यांना पीएच.डी. साठी मार्गदर्शन केले नाही तर सर्वांचे मेंटोर होते. त्यांना भौतिकशास्त्राच्या सर्व शाखांमध्ये प्रावीण्य होते. तात्त्विक विचारांमध्ये ते निष्णात होते. त्यांनी बर्याच वर्षांपासून भौतिकशास्त्रातील एम. फिल. अभ्यासक्रमात संशोधन पद्धतशास्त्र विषय त्यांनी शिकवला आहे.