Breaking news

श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने अनंता कुडे यांना श्रीराम सामाजिक पुरस्कार तर डॉ तृप्ती शहा यांना श्रीराम सामाजिक वैद्यकीय पुरस्कार प्रदान

वडगाव मावळ : श्रीराम नवमी उत्सवानिमित्त वडगाव मधील श्रीराम नवमी उत्सव समिती च्या वतीने मागील 46 वर्षांपासून श्रीराम जन्म उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी ह भ प पांडुरंग महाराज गायकवाड यांचे देवजन्माचे प्रवचन झाले. या कार्यक्रम प्रसंगी श्री पोटोबा देवस्थान चे विश्वस्त सचिव अनंता कुडे यांना श्रीराम सामाजिक पुरस्कार, तर डॉ तृप्ती शहा यांना श्रीराम सामाजिक (वैद्यकीय) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

             वडगाव मधील जेष्ठ समाजसेवक स्वर्गीय ज्ञानेश्वर तुकाराम गाडे व स्वर्गीय श्रीमती पार्वती शंकरराव कदम यांचे स्मरणार्थ गत वर्षांपासून, समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जपून सेवाभावी समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान संस्थेच्या वतीने केला जात आहे. त्या अनुषंगाने यावर्षी अनंता कुडे यांना त्यांच्या मागील अनेक वर्षांपासूनचे गणेशउत्सव मंडळ सदस्या पासून झालेली सामाजिक कार्याची सुरूवात ते आता पर्यंत तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे सचिव पद सांभाळून केलेल्या पारदर्शक, निःस्वार्थ सेवाभावी कार्याची दखल घेऊन समितीचे वतीने सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ तृप्ती शशिकांत शहा यांनी मागील जवळपास 50  वर्षांपासून वैद्यकीय सेवेमध्ये अनेक गरजू रुग्णांला अतिशय माफक स्वरूपात केलेल्या सेवाकार्य केले आहे. वडगांव मध्ये सर्वात प्रथम महिला भजनी मंडळ स्थापन करून, तसेच गावातील अनेक महिलांना त्या काळात विमान प्रवास घडवून खऱ्या अर्थाने महिलांचे सबलीकरण करत त्यांना एकत्र व्यासपीठ निर्माण करून दिले. या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.                           

        यावेळी मावळ भाजपा चे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी आपले मनोगतात संस्थेनी पुरस्कार्थी यांची केलेली निवड, त्यांच्या कार्याची दखल घेऊन हि सार्थ निवड केली आहे असे गौरवउदगार काढले. यावेळी श्री पोटोबा देवस्थान चे उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, अरुण चव्हाण, ॲड. अशोकराव ढमाले, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे, मा सभापती गुलाबराव म्हाळसकर, रेवतीताई वाघवले, मा उपसभापती प्रविण चव्हाण, गंगाधर ढोरे, जितेंद्र कुडे, सनदी लेखपाल विजया आगळमे, तुकाराम गाडे, अतुल राऊत, अतिश ढोरे, श्रीनिवास कुलकर्णी, नितीन चव्हाण, प्रसाद पिंगळे, अर्चना कुडे आदिसह भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रस्थाविक नंदकिशोर गाडे, सूत्रसंचालन  सचिव शिवानंद कांबळे, मानपत्रवाचन भुषण मुथा व स्नेहा भंडारी यांनी केले. आभार माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी मानले.

इतर बातम्या

महागाई व बेरोजगारीने त्रस्त झालेले सर्वसामान्य नागरिक आपल्याला मतदान करणार नाही याची खात्री पटल्याने भाजपाने राज्यात सर्वत्र फोडाफोडीचे राजकारण केले - निखिल कवीश्वर