Breaking news

नगरसेवक राजू बच्चे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा; नेते व मित्र परिवाराची मोठी उपस्थिती

लोणावळा : हॅट्रिक किंग नगरसेवक अशी ओळख असलेले तुंगार्ली भागातील ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष राजू बच्चे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नेते मंडळी व त्यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. राजू बच्चे हे सलग चार वेळा तुंगार्ली भागातून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. तुंगार्ली भागात त्यांनी केलेली विकासकामे याच्या जोरावर नागरिक त्यांना दरवेळी निवडून देत आहेत. सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते यांचा त्यांना पाठिंबा मिळत असल्याने ते कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह न घेता प्रत्येक वेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात व विजयी देखील होतात. 

     लोणावळा शहराच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. तुंगार्ली भागातील रस्ते, गटारे आदी कामे नियोजन बध्द पद्धतीने त्यांनी केली आहेत. देशात स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू होण्यापूर्वी त्यांनी तुंगार्ली प्रभाग कचरा व कचराकुंडी मुक्त केला होता. पुढे लोणावळा शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवताना हाच प्रभाग पथदर्शी प्रभाग म्हणून पुढे करण्यात आला होता. ओंकार तरुण मंडळाच्या माध्यमातून देखील त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सलग 20 वर्ष लोणावळा नगर परिषदेचे नगरसेवक पद भूषविल्यानंतर देखील ते जमिनीवर आहेत.

     संत तुकाराम सह साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, लोणावळा माजी नगराध्यक्ष अमित गवळी, लोणावळा शहर काँग्रेस अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, भाजपा शहराध्यक्ष अरुण लाड, राष्ट्रवादी माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक जीवन गायकवाड, माजी नगरसेवक दत्तात्रय येवले, विजय मोरे, उमेश तळेगावकर, बंडा अंभोरे, ज्ञानेश्वर येवले, गंगाराम मावकर, हर्षल होगले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष विनोद होगले, लोणावळा युवक शहर अध्यक्ष अजिंक्य कुटे, कैलास गायकवाड, शिवाजी आसवले, रज्जाक पठाण, कासम भाई शेख यांच्यासह अनेक मान्यवर व मित्र मंडळ उपस्थित होते.

इतर बातम्या