Breaking news

Lonavala News : शिवसेनेच्या चित्रकला स्पर्धेत पाचशेहून अधिक विद्यार्थी झाले सहभागी

लोणावळा : हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रभाग क्रमांक दहा यांच्यावतीने आज रायगड उद्यान लोणावळा येथे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत 500 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते इयत्ता पहिली ते दहावी दरम्यान चार गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना आयोजकांच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मागील वर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

     चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना मावळ विधानसभा संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, शिवसेना महिला आघाडी सहसंपर्क संघटीका शादान चौधरी, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, महिला आघाडी पुणे जिल्हा संघटीका शैलाताई खंडागळे, महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश केदारी, उपतालुकाप्रमुख अनिल ओव्हाळ, माजी नगरसेवक माणिक मराठे, शिवदास पिल्लै, कल्पना आखाडे, सिंधु परदेशी, मधुकर पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    चित्रकला स्पर्धेचे आयोजन शिवसेना उपशहरप्रमुख संजय भोईर, विभाग प्रमुख बाळासाहेब मोहोळ, विभाग संघटक शेखर कारके, उपविभाग प्रमुख सचिन गोणते, शाखाप्रमुख अमोल शिंदे, सागर भोमे, शाखाप्रमुख प्रविण कदम, शाखाप्रमुख उमेश कालेकर , युवासेना उपशहर अधिकारी धीरज मोहोळ आदींनी केले होते तर

स्पर्धेचे परिक्षण कला शिक्षक दत्तात्रय थोरात, चंद्रकांत जोशी, नितीन तिकोणे, प्रमोद पांचांळ, रमेश बोंद्रे, बाळकृष्ण बलकवडे यांनी केले.

इतर बातम्या