Breaking news

अहमदाबादमध्ये समस्त महाजन ट्रस्टकडून प्राण्यांसाठी दोन ॲम्बुलन्सचे लोकार्पण

मावळ माझा न्युज नेटवर्क : आज 18 मे रोजी अहमदाबाद शहरात समस्त महाजन ट्रस्टतर्फे प्राण्यांसाठी दोन अत्याधुनिक ॲम्बुलन्स सेवांचे लोकार्पण करण्यात आले. या विशेष कार्यक्रमाला गुजरात राज्याचे माजी शिक्षणमंत्री श्री. भूपेंद्रसिंह, भारत सरकारच्या ॲनिमल वेल्फेअर बोर्डाचे सदस्य श्री. रामावतार सिंग, एल.जी. युनिव्हर्सिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. मनीषभाई, तसेच समस्त महाजन ट्रस्टचे श्री. गिरीशभाई शहा, श्री. परेशभाई शहा, श्री. प्रकाशभाई पोरवाल व अहमदाबादमधील अनेक प्राणीमित्र उपस्थित होते. 

     कार्यक्रमात बोलताना श्री. भूपेंद्रसिंह यांनी सांगितले की, भारतात प्रथमच वर्धन युनिव्हर्सिटीची स्थापना होत असून, ही युनिव्हर्सिटी अहमदाबादमध्ये उभारण्यात येत आहे. ही युनिव्हर्सिटी प्राणी कल्याणासाठी समर्पित असून, ट्रस्टने प्रदान केलेल्या ॲम्बुलन्स सेवेमुळे घायल पशुपक्ष्यांचे त्वरित आणि सुसज्ज उपचार शक्य होणार आहेत.

      समस्त महाजन ट्रस्टचे ट्रस्टी श्री. गिरीशभाई शहा यांनी माहिती दिली की, अहमदाबादसाठी दिल्या गेलेल्या दोन ॲम्बुलन्स अत्याधुनिक असून, त्यामध्ये मोठ्या प्राण्यांचे शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय, ट्रस्ट लवकरच शहरासाठी आणखी नऊ प्राणी ॲम्बुलन्स उपलब्ध करून देणार आहे. या सेवेमध्ये भारतात प्रथमच तयार करण्यात आलेली हायड्रॉलिक यंत्रणेसह सुसज्ज ॲम्बुलन्स समाविष्ट असून, त्याचे उद्घाटन अहमदाबादमध्येच करण्यात आले आहे. या सुविधा मोठ्या प्राण्यांचे ऑपरेशन अधिक सुलभ आणि सुरक्षित बनवतील.

    कार्यक्रमाच्या शेवटी श्री. प्रकाशभाई पोरवाल यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

इतर बातम्या

Sangmeshwar l राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारकासाठी प्रयत्नशील; छत्रपती संभाजी स्मारक भव्य दिव्य करण्यासाठी पुरातत्व व बांधकाम विभागाने अभ्यास करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार