Breaking news

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त कार्ला येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव


लोणावळा : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी श्री एकवीरा विद्या मंदिर शाळा व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता कॉलेजच्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

     या सत्कार समारंभात, इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या तसेच 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्याचा आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याचा उद्देश होता.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष अशोक पडवळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून मानद अध्यक्ष सचिन भानुसघरे, सल्लागार भाऊसाहेब हुलावळे, खजिनदार विशाल जमदाडे, सह-खजिनदार मंगेश हुलावळे, सदस्य नितीन वाडेकर, समाजसेवक कैलास पडवळ, प्राचार्य संजय वंजारे, संजय हुलावळे, सचिन हुलावळे, संतोष ढमाले आणि तानाजी भानुसघरे उपस्थित होते. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गुणवंतांचा गौरव करून संभाजी महाराजांच्या जयंतीला एक प्रेरणादायी आणि सामाजिक बांधिलकीची दिशा देण्यात आली.

इतर बातम्या