मावळातील शिक्षक राजकुमार वरघडे महाराष्ट्र शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

पवनानगर : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेतील समाजशास्र विषयाचे शिक्षक राजकुमार भरत वरघडे यांना अविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र शिक्षक रत्न पुरस्कार देऊन पन्हाळा कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिक्षक नेते धनंजय नांगरे, मावळ शिक्षक परिषद अध्यक्ष राम कदम बांडे, मावळ शिक्षक पतसंस्था अध्यक्ष भारत काळे, रियाज तांबोळी, गणेश ठोंबरे, दिपक डांगले, रविंद्र सुरसावत उपस्थित होते. शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी वरघडे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच मावळ तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.