Breaking news

ताजे सोसायटीच्या अध्यक्ष पदी बाळासाहेब पिंपरे व उपाध्यक्ष पदी सुमन केदारी यांची बिनविरोध निवड

लोणावळा : ताजे विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष पदी बाळासाहेब पंढरीनाथ पिंपरे तर उपाध्यक्ष पदी सुमन शंकर केदारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

      वडगाव निबंधक कार्यालयात घेण्यात आलेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने सहायक निबंधक आर. के. निखारे व सचिव संभाजी केदारी यांनी पिंपरे यांची अध्यक्ष पदी तर केदारी यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी संचालक काळुराम केदारी, भाऊसाहेब गरुड, जयशिंग गरुड, शाम केदारी, मच्छिन्द्र केदारी, संतोष केदारी, गोरख मोहिते, भानुदास ढमाले, रुपचंद गायकवाड, ताराबाई गरुड यांनी त्यांचा पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच शंकर केदारी, रमेश सुतार, भानुदास येवले, सोमनाथ केदारी, भाऊ केदारी, लाला कुटे, मिलिंद गरुड, वामन गरुड, विजय गरुड, रामदास गायखे, दत्तात्रय आंद्रे, शिवाजी केदारी  यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.

इतर बातम्या