Breaking news

Lokasabha Election : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत मावळ विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू

लोणावळा : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत मावळ विधानसभा मतदारसंघ निवडणूक दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आज (11 एप्रिल) नूतन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग तळेगाव येथील सभागृहात सुरू करण्यात आला. सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे केंद्रप्रमुख तसेच सहाय्यक अधिकारी कर्मचारी यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुरेंद्र नवले तसेच मावळ तहसीलदार विक्रम देशमुख यांनी कर्मचारी अधिकारी वर्गास प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. 

       या प्रथम टप्प्यातील दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये साधारणता मावळ मतदार संघातील साडेतीन हजार अधिकारी कर्मचारी यांचे विविध सत्रांमध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. आजच्या प्रशिक्षणामध्ये प्रथम सत्रात प्रांत अधिकारी यांनी मतदान प्रक्रिया व कर्मचारी अधिकारी यांची मतदानाच्या आदल्या दिवशी व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आपली कर्तव्य व अधिकार काय असतील याबाबत सखोल विवेचन केले. 

       यादरम्यान प्रत्येक अधिकाऱ्याने गोपनीयतेचा भंग होणार नाही व मतदान प्रक्रिया ही निष्पक्ष व खुल्या वातावरणात पार पाडण्यात येऊन मतदान करणाऱ्या मतदाराला केंद्रस्थानी मानून आपले राष्ट्रीय कर्तव्य प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याने पार पाडावे असे आव्हान केले. 

यावेळी मा. प्रांत अधिकारी यांनी पीपीटी च्या माध्यमातून सखोल विवेचन तर केलेच त्याचबरोबर सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या शंकांचे निरसन केले. त्याचबरोबर आपल्याकडून मुख्यत्वे कोणत्या चुका होऊ शकतात व त्या कशा टाळाव्यात त्याचबरोबर माननीय निवडणूक आयोगाचे जे निर्देश आहेत ते काय आहेत याचे विस्तृत विवेचन केले. यासोबतच मतदान यंत्रा बाबत माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी अत्यंत सोप्या भाषेत  दिली व प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखवले. 

       यावेळी निवासी नायब तहसीलदार तथा प्रशिक्षण विभाग प्रमुख गणेश तळेकर व इतर अधिकारी उपस्थित होते. या प्रशिक्षण सत्रांमध्ये प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान यंत्रे स्वतः हाताळणी करणे व त्या संबंधीची सर्व माहिती प्रात्यक्षिक करून घेणे बंधनकारक आहे. यामुळे प्रत्यक्ष मतदानावेळी चुका होणार नाहीत.

यावेळी प्रांत अधिकारी यांनी सर्वांना आवाहन व सूचना केल्या की कोणीही प्रशिक्षण व प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणी टाळू नये प्रशिक्षणास गैरहजर राहू नये. आज दिवसभर व उद्या पूर्ण दिवस हे हाताळणी प्रशिक्षण सर्व क्षेत्रीय अधिकारी यांच्यासह सुरू राहणार असल्याचे श्री तळेकर यांनी सांगितले.

इतर बातम्या

महागाई व बेरोजगारीने त्रस्त झालेले सर्वसामान्य नागरिक आपल्याला मतदान करणार नाही याची खात्री पटल्याने भाजपाने राज्यात सर्वत्र फोडाफोडीचे राजकारण केले - निखिल कवीश्वर