Maval Big News : राष्ट्रीय स्थरावरील नेमबाजीत मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांची गगनभरारी

पवनानगर (प्रतिनिधी) : केरळ येथील त्रिवेंद्रम येथे 20 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान झालेल्या 65 व्या नॅशनल रायफल शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये मावळ तालुक्यातील नेमबाज विध्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्यांची राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली आहे. चॅम्पियनशिप मध्ये स्नेहल राज दाभाडे, दया बाळासाहेब पारखी व साहिल मावकर यांची राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी निवड करण्यात आली आहे. स्नेहल दाभाडे हिने 50 मीटर 3 पोझिशन या प्रकारामध्ये 600 पैकी 570 गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात दुसरा तर देशपातळीवर 27 वा क्रमांक मिळवला आहे. तसेच 50 मी प्रोन प्रकरा मध्ये तिने 606.3 गुण मिळवून यश संपादन केले आहे. 10 मीटर एअर रायफल मध्ये 613.6 गुण मिळवल्याने तिची निवड इंडिया टीम इंटरनॅशनल ट्रायल साठी झाली आहे. त्याचप्रमाणे नेमबाज दया बाळासाहेब पारखी याने 50 मीटर प्रोन प्रकारामध्ये ज्युनिअर गटात 599.7गुण मिळवून महाराष्ट्रामध्ये 5 वा क्रमांक मिळवला. तसेच साहिल मावकर याने 601.5 गुण मिळवून महाराष्ट्रामध्ये 4 क्रमांक मिळवला. इंडिया टीम ट्रायल साठी या दोघांची ही निवड झाली आहे. हे सर्व विद्यार्थी प्रशिक्षक स्नेहल दाभाडे, राज दाभाडे यांच्याकडे मार्गदर्शन घेत यश संपादन करत आहे. तसेच ओझर्डे गावाचे सरपंच बाळासाहेब पारखी यांचे मार्गदर्शन त्यांना मिळत आहे.