Maval Crime News : कोथुर्णे निर्भया प्रकरण; आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी शिवसेना प्रयत्न करणार - सचिन आहिर

पवनानगर : मावळ तालुक्यातील कोथुर्णे निर्भया प्रकरणातील नराधाम आरोपी व त्याला साथ देणारी त्याची आई या दोघांना फाशीचीच शिक्षा व्हावी याकरिता शिवसेना प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी कोथुर्णे ग्रामस्त व पिडीत कुटुंबांला दिले. सचिन आहिर यांनी आज पिडीत कुटुंबाची भेट घेत त्याच्या सोबत शिवसेना परिवार असून याबत आरोपी ला लवकरात लवकर फाशी व्हावी तसेच त्या आरोपी च्या आई ला देखील फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना याबाबत माहिती देऊन नामवंत सरकारी वकील उज्जवल निकम यांना याबाबत नेमण्यासाठी ग्रामस्थांनी जी मागणी केली ती पोहचवली जाणार आहे. सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा यासाठी शिवसेना प्रयत्न करेल असे सांगितले. यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहीर यांनी पिडीत कुटुंबांला 51000 ची मदत जाहीर केली. यावेळी माजी आमदार गौतम चाबूकस्वार, युवासेना युवा जिल्हाधिकारी अनिकेत घुले, सल्लागार भारत ठाकूर, मा सभापती ज्ञानेश्वर दळवी, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, शांतराम भोते, उपतालुकाप्रमुख अमित कुंभार, आशिष ठोंबरे, महिला आघाडी जिल्हा संघटीका शैला खंडागळे, संघटक सुरेश गायकवाड, विभाग प्रमुख राम सावंत, युवराज सुतार, उमेश गावडे, संजय भोईर, कालेकर, देहूरोड शहरप्रमुख भरत नायडू, विकास कालेकर, बाळासाहेब शेलार, शक्ती जव्हेरी, किशोर शिर्के, मदन शेडगे, अशोक निकम, यशवंत कालेकर, विभाग प्रमुख किसन तरस, प्रकाश सावंत, युवासेना चिटणीस श्याम सुतार, जयवंत दळवी, दत्ता थोरवे, एकनाथ जांभूळकर, जाधव, संतोष कालेकर, सरपंच प्रमोद दळवी, जयदीप कुंभार, तेजस गांधी, धीरज घारे, वसंत काकडे उपस्थित होते.