Breaking news

MTDC चा वाॅटरपार्क पर्यटकांनी गजबजला; ऊन्हाळी सुट्टयांचा आनंद घेण्यात पर्यटक मग्न

लोणावळा : पर्यटन विकास महामंडळ (MTDC) कार्ला सध्या पर्यटकांनी गजबजला असून वाॅटरपार्क व रेनडान्सचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. पुढील आठवड्यापासून शाळांना सुरुवात होणार असल्याने ऊन्हाळी सुट्टयांचे शेवटचे शनिवार व रविवार मज्जा मस्ती करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले असून पर्यटक विकास महामंडळाचे वाॅटरपार्क हाऊसफुल झाल्याचे चित्र आज रविवारी पहायला मिळाले.

     याविषयी बोलताना पर्यटक विकास महामंडळ कार्ला येथील व्यवस्थापक सुहास पारखी म्हणाले, मागील काही दिवसांपासून वाॅटर पार्कला पर्यटकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ऊन्हाळी सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लोणावळा खंडाळा शहरांना पसंती देत आहेत. तर कार्ला येथी एमटीडीसीचे वाॅटरपार्क व बोटिंग पहिल्यापासून पर्यटकांची पसंती राहिली असल्याने येथे गर्दी होत असते. येणार्‍या पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आमचे व्यवस्थापन व कर्मचारी वर्ग काम करत असतात. दुपारच्या सत्रात पावसाने हजेरी लावल्याने काहीकाळ पर्यटकांची तारांबळ झाली मात्र पाऊस उघडताच पर्यटकांनी पुन्हा वाॅटरपार्क मधील उंच स्लाईड व रेनडान्सचा आनंद घेण्यास सुरुवात केली.

इतर बातम्या