लोणावळा खंडाळा चालक मालक टॅक्सी असोसिएशन व महाराष्ट्र वाहतुक सेना संलग्न लोणावळा खंडाळा चालक मालक संघटना या दोन्ही वेगळ्या संघटना

लोणावळा : लोणावळा खंडाळा चालक-मालक टॅक्सी असोसिएशन ही एक नोंदणीकृत संघटना आहे. ही संघटना लोणावळा व खंडाळा परिसरामधील टुरिस्ट व्यवसाय करणाऱ्या टॅक्सी चालक व मालकांचे प्रतिनिधित्व करत आहे. या संघटनेचा रजिस्टर नोंदणी क्रमांक 53/2020 असून अमोल परशुराम शेडगे हे या संघटनेचे सध्याचे अध्यक्ष आहेत.
9 मे 2023 रोजी महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश केदारी यांनी महाराष्ट्र वाहतूक सेना संलग्न लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक-मालक संघटना यांची संलग्न पदाधिकारी यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामुळे टॅक्सी चालक-मालक यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. याकरिता अमोल शेडगे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत लोणावळा खंडाळा चालक-मालक टॅक्सी असोसिएशन व महाराष्ट्र वाहतूक सेना संलग्न लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक-मालक संघटना ह्या दोन्ही वेगवेगळ्या संघटना आहेत. या दोन्हींचा परस्परांशी काहीही संबंध नाही. याची सर्व वाहन चालकांनी नोंद घ्यावी व मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नये असे म्हंटले आहे.
महाराष्ट्र वाहतुक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश केदारी यांनी देखील काल संलग्न पदाधिकारी यादी जाहिर करताना दोन्ही संघटना वेगवेगळ्या असल्याचे म्हंटले होते. तरी देखील काही वाहतूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने हा खुलासा करण्यात आला असल्याचे शेडगे यांनी सांगितले.