Breaking news

शेतकरी विरोधी काळे कायदे, महागाई, बेरोजगारीच्या विरोधात लोणावळा काँग्रेसचा रास्ता रोको

लोणावळा : केंद्र शासनाने शेतकरी विरोधी केलेले काळे कायदे, देशात इंधन, गॅस व जीवनावश्यक वस्तूंची झालेली भाववाढ, झपाट्याने वाढत असलेली बेरोजगारी व सरकारी अस्थापनांचे सुरु असलेले खाजगीकरण याविरोधात आज भारतीय काँग्रेसने देशभरात पुकारलेल्या भारत बंदला लोणावळा शहर काँग्रेसने पाठिंबा देत मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर अर्धातास रास्ता रोको केले. तसेच गवळीनाका पुर्णतः बंद तर उर्वरित बाजारात अंशतः बंद पाळत आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.

    सकाळी सव्वा अकरा वाजता कुमार चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर येत केंद्र शासनाच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा दिल्या. भारत हा लोकशाही प्रधान देत असताना भाजपा व नरेंद्र मोदी देशात हुकुमशाही पद्घतीने वागत आहेत. मागील अकरा महिन्यांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले शेतकरी केंद्राने केलेल्या शेतकरी कायद्यांतील तीन जुलमी कायदे रद्द करा म्हणून आंदोलन करत असताना या आंदोलनाची दखल केंद्र सरकार घेत नाही. पेट्रोल, डिझेलचे व घरगुती गॅसचे दर भडकेले असताना व सर्वसामान्य नागरिक यामध्ये पुरता भरडलेला असताना त्यावर केंद्राचे नियंत्रण राहिलेले नाही. देशातील युवकांना दोन कोटी रोजगार दरवर्षी देण्याची घोषणा मोदी सरकारने केली होती, प्रत्यक्षात दरवर्षी कोट्यावधी युवक बेरोजगार झाले आहेत. सरकारी अस्थापनांचे खाजगीकरण सुरू आहे. नागरिक बेरोजगार होत असून नोकरीची हमी राहिलेली नसताना मोदी सरकार याविरोधात भूमिका घेत असल्याने या सरकारने सत्तेतून पाय उतार व्हावे अशी मागणी यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस निखिल कविश्वर, लोणावळा शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड व पदाधिकारी यांनी केली.

    लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रास्ता रोको आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस निखिल कविश्वर, महिलाध्यक्षा पुष्पा भोकसे, युवक अध्यक्ष दत्ता दळवी, उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल, माजी उपनगराध्यक्ष सुधिर शिर्के, गटनेत्या आरोही तळेगावकर, नगरसेविका पुजा गायकवाड, सुर्वणा अकोलकर, उषा चौधरी, ज्येष्ठ नेते वसंत भांगरे, नासिर शेख, जंगबहादूर बक्षी, रवी सलोजा, सुबोध खंडेलवाल, बाबुभाई शेख, मारुती तिकोणे, संजय वाघ, सेवादल अध्यक्ष सुनिल मोगरे, ओबीसी अध्यक्ष आकाश परदेशी, अल्पसंख्याक अध्यक्ष जाकिर शेख, सर्फराज शेख, जितेंद्र कल्याणजी, सत्तार शेख, संभाजी गवळी, संजय शिंदे, अनिल गवळी, महादू गवळी, अय्याज शेख, अमोल शेडगे, निखिल तिकोणे, प्रफुल्ल रजपुत, रुपाली क्षिरसागर, शुभम हारपुडे, पप्पू औरंगे, फिरोज शेख, गणेश गवळी, मारुती राक्षे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते.

इतर बातम्या