Breaking news

Lonavala News : लोणावळा शहर शिवसेनेकडून कोथुर्णे बालिका हत्याकांडाचा निषेध; आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

लोणावळा : शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने आज शुक्रवारी (5 ऑगस्ट) रोजी लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मावळ तालुक्यातील कोथुर्णे या गावातील लहान बालिकेवर झालेला अत्याचार व निर्घृण हत्येचा जाहीर निषेध नोंदवत सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांना आरोपीला  कठोर फाशीची शिक्षा सुनावली जावी यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी उपतालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, महिला आघाडी संघटिका कल्पना आखाडे, शहर संघटक सुभाष डेनकर, समन्वयक जयवंत दळवी, उपशहरप्रमुख संजय भोईर, प्रकाश पाठारे, सल्लागार रामभाऊ थरकुडे, अवजड वाहतूक सेना पुणे जिल्हा संघटक नरेश काळवीट, विभाग प्रमुख अशोक निकम, विभाग संघटक एकनाथ जांभूळकर, महिला आघाडी सहसंघटिका मनिषा भांगरे, उपशहर संघटिका सुरेखा देवकर, प्रभा अकोलकर, अनिता गायकवाड, सीमा दिघे, मार्गारेट मुन्ना स्वामी, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, अशोक बोंद्रे, विभाग प्रमुख रविंद्र टाकळकर, उल्हास भांगरे, मंगेश येवले, शेखर कारके, रतन मराठे, उपविभाग प्रमुख नागेश दाभाडे, किशोर भांगरे, युवासेना समन्वयक दत्ता थोरवे, उपशहर अधिकारी विवेक भांगरे, वेहेरगावचे शाखाप्रमुख कैलास पडवळ, जेष्ठ शिवसैनिक गणपत गोजे, शाखा प्रमुख जितेंद्र ठोंबरे, गणेश जाधव, शिवराज चव्हाण, उत्तम ठाकर, धीरज घारे, राजूभाई शेख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या