Breaking news

Lonavala News : बंध मैत्रीचे व निर्मिती फाऊंडेशन च्या वतीने 511 विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप

लोणावळा : लोणावळ्यातील सामाजिक कार्यकर्त्या डाॅ. सिमा शिंदे यांच्या निर्मिती फाऊंडेशन व बंध मैत्रीचे या सामाजिक संस्थांच्या वतीने कुसगाव विभागातील जिल्हा परिषदेच्या 17 शाळांमधील तब्बल 511 विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. साडेसहा लाख रुपयांचे हे शालेय साहित्य असून समाजातील अनेक घटकांनी या उपक्रमात हातभार लावला असल्याचे डाॅ. सिमा शिंदे यांनी सांगितले. कुसगाव  जिल्हा परिषद शाळेत या उपक्रमाचा समारोप मावळचे गटविकास अधिकारी सुधिर भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. यावेळी मुलांना कुंभाराचे मातीला आकार देण्याचे काम कसे चालते याची माहिती व्हावी याकरिता एका स्वंयचलित कुंभार चाक (पाॅटरी मशिन) शाळेला भेट देण्यात आले.

     यावेळी बोलताना संवेदनशीलता अंगी असणं हा खूप महत्त्वाचा गुण आहे. जे लोक संवेदनशील असतात ते दानशूर देखील असतात. इतरांसाठी झटत राहणं अशा लोकांना आवडतं. अशी लोकं जर एकाच ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र आले तर त्यांच्या हातून नेहमीच उत्कृष्ट कार्य घडत रहाते अशा व्यक्तीकडून प्रेरणा घ्या, आज त्यांच्याकडून काही घेत असताना भविष्यात आपण त्यांच्यासारखा मदतीचा हात इतरांना देऊ शकू इतके सक्षम व्हा असा सल्ला मावळचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी निर्मिती फौंडेशनच्या अध्यक्ष डॉ. सीमा शिंदे, लोणावळा शहरातील प्रसिद्ध उद्योजक गिरीश पारेख, कुसगावच्या सरपंच अश्विनी गुंड, उपसरपंच सुरज केदारी, आपटी गावच्या सरपंच अनिता शिळवणे, ग्रा.पं. सदस्य राजेश काटकर, फरीन शेख, गणेश गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते योगेश लोहार, ज्ञानेश्वर गुंड, केंद्र प्रमुख मुकुंद तनपुरे, शाळेच्या मुख्याध्यापिका आशा मानकर आदींसह ग्रामस्थ, शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव शेलार यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहादू मानकर यांनी मानले.

इतर बातम्या

वसंत व्याख्यानमाला | कारगिल टायगर हिल्सवर 150 जणांच्या विरोधात आम्ही 7 जण लढलो, डोळ्यातून - नाकातून रक्त गळत होते, अंगभर गोळ्या होत्या मात्र लढण्याची जिद्द व आत्मविश्वास कायम होता - परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंह याद