Breaking news

Lonavala College : लोणावळा महाविद्यालयाला पाॅवर लिफ्टिंग मुले स्पर्धेत सांघिक विजेतेपद

लोणावळा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांच्या वतीने इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव या ठिकाणी आंतर महाविद्यालयीन जिल्हास्तर पाॅवर लिफ्टिंग मुले स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट संचलित डॉ. बी. एन. पी. कला, एस. एस जी. जी वाणिज्य एस. एस. ए. एम विज्ञान महाविद्यालय (लोणावळा महाविद्यालय) लोणावळा महाविद्यालयाने मुलांच्या गटात विजेतेपद पटकाविले. वजन गट 105 किलोग्रॅम - कुंजन दळवी (प्रथम) व लोहितक्ष जाधव (द्वितीय), 59 किलो ग्रॅम - सचिन चव्हाण (तृतीय) तर 74 किलो ग्रॅम - अनिकेत ढाकोळ (तृतीय), 84किलो ग्रॅम - गौरव विकारी (द्वितीय), 84 किलो - युसुफ खान (तृतीय), 93 किलो ग्रॅम - जयेश देशपांडे (तृतीय), श्रेयश पवार, सिद्धांत पाटेकर, यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले सदर विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक दीपक तारे, तेजस भांगरे, आकाश गायकवाड यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे. सदर खेळाडूंपैकी प्रथम द्वितीय क्रमांकाच्या खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. 

      तसेच कला, वाणिज्य,विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी कॉमर्स विद्यार्थी तनिष्क भरत बच्चे शालेय राज्यस्तर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तर ओमकार भगवान बोरकर विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महाविद्यालय व संस्थेच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आला. व पुढिल स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सदर वेटलिफ्टिंग खेळाडुंना बापु साहेब वाघवले यांचे मार्गदर्शन लाभत आहे. लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष रमेशचंद्र नय्यर, सचिव दत्तात्रय पाळेकर विश्वस्त अँड नीलिमा खिरे, विश्वस्त नंदकुमार वाळंज, विश्वस्त दत्तात्रय येवले, प्राचार्य डॉ. डी.जे. दरेकर, कनिष्ठ विभाग प्रमुख प्राध्यापक राहुल सलोदे, सी.डी.सी सदस्य विशाल पाडाळे आदी मान्यवर सदर वेळी उपस्थित होते.

इतर बातम्या