Breaking news

जागतिक महिला दिन । खोपोलीच्या पोलीस निरीक्षक पदाचा सन्मान मिळाला क्षितिजा जगदीश मरागजेला

खोपोली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी कु क्षितिजा जगदिश मरागजेच्या हाती खोपोली पोलीस स्टेशनची सूत्रे सोपवून विविध क्षेत्रांत कर्तुत्व बजावलेल्या कर्तबगार महिलांचा जणू सन्मानच केला.

     "मुलगी शिकली प्रगती झाली" या उक्तीचा प्रत्यक्ष प्रत्यय आज आला. खोपोली पोलीस स्टेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला गेला. कुस्ती खेळात राज्यस्तरावर सुवर्ण पदक विजेत्या आणि शालेय शिक्षण घेणाऱ्या कु. क्षितिजाच्या हाती पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे सोपवली. भविष्यात क्षितिजाच्या खांद्यावर जी जबाबदारी येऊ शकते त्याचे जणू प्रतिबिंब आज या कार्यक्रमातून प्रकट होताना दिसले. 

     वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ संगीता वानखेडे, डॉ कोठारी, आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वतःला झोकून देणारी भक्ती साठेलकर, उद्योग क्षेत्रात भरारी घेणाऱ्या कांचन जाधव, लायन्स क्लबच्या अध्यक्षा शिल्पा मोदी, पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या संतोषी म्हात्रे आणि सारिका सावंत, सामाजिक कार्यात कार्यरत असलेल्या इशिका शेलार, पूजा मरागजे यांच्यासह खोपोली पोलीस स्टेशनमधे कार्यरत महिला कर्मचारी वर्गाचा सन्मान करण्याच्या योग येणे हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद असल्याची भावना राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी व्यक्त केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर आणि इतर अधिकारी देखील उपस्थित होते.

इतर बातम्या