Breaking news

Karla News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महिलांना पोस्टाची मोफत विमा पाॅलिसी

कार्ला : हिंदु ह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती निमित्त कार्ला शाखेत कै संजय उर्फ आवानाना हुलावळे प्रतिष्ठानचा वतीने कार्ला गावातील महिलांना पोस्टाची मोफत विमा योजना काढून देण्यात आली. गावातील 65 महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

     तत्पूर्वी वडगाव न्यायालय बार असोसिएशनचा नवनियुक्त सचिव ॲड. सुधाताई सचिन डिंबळे यांचा हस्ते व कार्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच दिपाली हुलावळे यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच वडगाव न्यायालय बार असोसिएशनचा सचिवपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अँड. सुधा डिंबळे यांचा कै संजय उर्फ आवानाना हुलावळे प्रतिष्ठान, कार्ला ग्रामस्थ व कार्ला शिवसेना शाखेचा वतीने सत्कार करण्यात आला. 

    या कार्यक्रमा वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब हुलावळे, माजी सरपंच सागर हुलावळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे, ग्रामपंचायत सदस्या वत्सला अविनाश हुलावळे, ग्रामपंचायत सदस्या सोनाली मोरे, प्रतिष्ठानचे सदस्य रमेश जाधव, सतीश मोरे, ॲड सुनिल पटेकर, विशाल जमदाडे, अजय मोरे, शैलेश चव्हाण, राजु सावळे, आदेश हुलावळे, बाबाजी सोंडेकर, टपाल खात्याचे अधिकारी सिध्देश्वर कांबळे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ युवासेना कक्षाचे उपाध्यक्ष विशाल हुलावळे, ॲड सचिन डिंबळे, किरण गायकवाड, मंगेश हुलावळे, समीर हुलावळे, शाखा सन्मवयक विशाल वसंत हुलावळे, कैलास कुंडलिक हुलावळे, सचिन भिम हुलावळे, आदित्य हुलावळे, विनोद वसंत हुलावळे, अक्षय केदारी, आशिष हुलावळे, महीला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाऊसाहेब हुलावळे यांनी केले.

इतर बातम्या