लोणावळा शहर महायुतीच्या वतीने लोणावळ्यात जल्लोष; मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे जोरदार स्वागत
लोणावळा : लोणावळा शहर महायुतीच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे व अजित दादा पवार यांनी शपथ घेत राज्याचा कारभार हाती घेतल्याप्रकरणी लाडू वाटप करत फटाक्यांची आताच बाजी करत जल्लोष साजरा केला तसेच तीनही नेत्यांचे जोरदार स्वागत केले.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश प्राप्त झाले आहे. 5 डिसेंबर रोजी महायुतीच्या नेत्यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदी शपथविधी पार पडला. महाराष्ट्राने पुन्हा एकदा महायुतीला पाठिंबा दिला असल्याने पुढील पाच वर्ष महाराष्ट्रात गतिशील विकास करण्याचा मनोदय महायुतीतील तीनही घटक पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. लोणावळा शहरातून देखील महायुतीचे मावळ विधानसभेचे उमेदवार सुनील शेळके यांना तालुक्यातील सर्वाधिक मताधिक्य देण्यात आले आहे. तब्बल 17000 हून अधिकचे मताधिक्य लोणावळा शहरातून महायुतीला मिळाले आहे.
महायुतीला मिळालेले या यशाचा आज लोणावळा शहरांमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या सर्व घटक पक्षांनी एकत्र येत एकमेकाला लाडू व पेढे भरवत जल्लोष साजरा केला.
यावेळी लोणावळा शहर भाजपाचे शहराध्यक्ष अरुण लाड, लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास बडेकर, लोणावळा शहर शिवसेनेचे शहर प्रमुख संजय भोईर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे लोणावळा शहराध्यक्ष कमलशील म्हस्के, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष बाबा ओव्हाळ, भाजपा गटनेते व माजी नगरसेवक देविदास कडू, ज्येष्ठ नेते किरण गायकवाड, माजी राष्ट्रवादी शहराध्यक्ष जीवन गायकवाड, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष रवी पोटफोडे, माजी भाजपा शहराध्यक्ष बाबा शेट्टी, माजी उपनगराध्यक्ष सुभाष सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, माजी उपनगराध्यक्ष भरत हरपुडे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप दामोदर, माजी नगरसेविका मंदा सोनवणे, माजी नगरसेविका जयश्री आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष उमा मेहता, शिवसेना लोणावळा शहर महिला संघटिका मनीषा भांगरे, राजेश मेहता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मालन ताई बनसोडे, उत्तर भारतीय आघाडीचे भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष जयप्रकाश परदेशी, सनी पाळेकर, विशाल पाठारे, शैलेश कचरे, कृष्णा साबळे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.