Breaking news

Maval Political News | मावळ लोकसभेसाठी शिवसेना उबाठा गटाने कसली कंबर; गावभेट दौर्‍यांवर देणार भर

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कंबर कसली असून गाव भेट दौऱ्यावर भर देण्यात येणार आहे. नुकतीच दोन दिवसांपूर्वी वडगाव मावळ येथे शिवसेना उबाठा गटाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून त्याकरिता गाव भेट दौरे व भेटी गाठींवर देण्यात आला आहे. मावळ लोकसभेची जागा जिंकण्यासाठी बूथ लेवल पासून नियोजन करण्यावर भर देण्यात येणार आहे. खरंतर मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र मावळचे दोन वेळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे शिवसेना उबाठा गटाने या ठिकाणी दुसरा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजय वाघिरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. संजोग वाघिरे यांचा पिंपरी चिंचवड व मावळ भागामध्ये मोठा मित्रपरिवार व नातेवाईक गोतावळा असल्यामुळे त्याचा निश्चितपणे फायदा वाघिरे यांना होणार आहे. सोबतच मावळ तालुक्यामध्ये शिवसैनिक व पदाधिकारी हे मोठ्या संख्येने ठाकरे गटाच्या सोबत असल्याने ती देखील मोठी फळी वाघेरे यांच्यासाठी रात्रंदिवस काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

     शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना उपनेते, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, शिवसेना उपनेते पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना मावळ लोकसभा संघटक मा. संजोग वाघिरे पाटील, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख मा.आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, मावळ तालुका संपर्कप्रमुख प्रभाकर पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिवसेना मावळ तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी शिवसेना युवासेना,  महिला आघाडी, आजी-माजी नगरसेवक सर्व अंगीकृत संघटना सर्व पदाधिकारी यांची बुधवारी 07 फेब्रुवारी रोजी वडगाव येथे आढावा बैठक पार पडली.                                                                       

          या आढावा बैठकीला शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, तालुका प्रमुख आशीष ठोंबरे, जिल्हा संपर्क सह संघटीका शादान चौधरी, जिल्हा संघटीका शैला खंडागळे, तालुका संघटक अमित कुंभार, शांताराम भोते, मदन शेडगे, अशोक निकम, तालुका सल्लागार रमेश जाधव, उप तालुका प्रमुख एकनाथ जांभूळकर, सोमनाथ कोंडे, युवराज सुतार, काळु हुलावळे, तळेगाव दाभाडे शहरप्रमुख शंकर भेगडे, कामशेत शहरप्रमुख सतिश इंगवले, देहू रोड शहरप्रमुख भारत नायडु, देहू शहरप्रमुख बाबा भालेकर, लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, परेश बडेकर, अशोक बोंद्रे, ऊमेश गावडे, सतीश गरुड, संगीता सोनावणे, रुक्मिणी खरटमल, कृष्णा शिळवणे, उमेश दहिभाते, भरत भोते, उत्तम तरस, शिवाजी गाडे, विशाल दांगट, अक्षय साबळे, शिवाजी गाडे, कमलेश गाडवे, धीरज घारे, कुणाल सपकाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या