लोणावळ्यात बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ; भांगरवाडी श्रीराम मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवत बाजारपेठेत केले जोरदार शक्ती प्रदर्शन

लोणावळा : महाविकास आघाडीचे व इतर पक्षांचे समर्थन असलेले अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचाराचा लोणावळा शहरात जोरदार शुभारंभ करण्यात आला. भांगरवाडी येथील श्रीराम मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवत भांगरवाडी ते लोणावळा बाजारपेठ व गावठाण परिसरामध्ये पायी रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. या रॅलीमध्ये मावळ तालुक्यामधील नेत्यांसह लोणावळा शहरातील महाविकास आघाडीचे सर्व नेते तसेच भाजपचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या हस्ते श्रीराम मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवत या प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी बापूसाहेब भेगडे यांचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, सुभाषराव जाधव, माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, श्रीधर पुजारी, मच्छिंद्र खराडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासिर शेख, शिवसेना उभाठा पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब फाटक, काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, माजी नगराध्यक्ष अमित गवळी, राजू बच्चे, मारुती तिकोने, बाबुभाई शेख, श्वेता वर्तक, बाळासाहेब पायगुडे, संतोष मुर्हे, संदीप काकडे, राहुल गोळे, बंटी भेगडे, यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते. प्रचार रॅलीच्या माध्यमातून लोणावळा शहरांमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले तसेच रॅलीमध्ये सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनी पिपाण्या वाजवत अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या चिन्हाचा प्रचार केला.