Breaking news

पवनानगर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी मोफत करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

पवनानगर : पवनानगर येथे दहावीच्या  विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती पवना शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संतोष खांडगे यांनी दिली. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व पवना शिक्षण संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दि. 5 जुलै रोजी पवना विद्या मंदिर येथे  मावळ तालुका व पवन मावळातील विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन शिबिर करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व पालकांना दहावी नंतर पुढे काय? असा प्रश्न कायम पडतो त्यामुळे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संतोष खांडगे यांनी पुणे येथील न्यू समर्थ स्मार्ट स्कूलींग यांच्या प्रयत्नातून हे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात विज्ञान, वाणिज्य व कला या तिन्ही शाखांमधील शिक्षणाचे महत्त्व व त्यातून जीवनाला मिळणाऱ्या पुढील दिशा या विषयांवरती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते व न्यू समर्थ स्मार्ट स्कूलींगचे कार्यकारी संचालक प्राध्यापक संजय देशमुख व प्राध्यापक सुरेश पांडे हे मार्गदर्शन करणार आहे. मावळ तालुक्यातील तसेच पवनमावळ परिसरातील सर्व 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या शिबीराचा लाभ होणार आहे तरी परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी व  पालकांनी मंगळवारी सकाळी बहुसंख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी शाळेच्या प्राचार्या अंजली दौंडे यांनी केले आहे.

इतर बातम्या