Breaking news

Lonavala Traffic l सलग सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी; राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा लांबच लांब वाहनांच्या रांगा

मावळ माझा न्युज चा व्हॉटसअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा 

लोणावळा : सलग तीन दिवस सुट्ट्या (Three Days Long Weekend) आल्याने या सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी लोणावळा शहरांमध्ये (Lonavala City) लाखोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. पर्यटकांच्या या वाहनांमुळे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळा शहरात दुतर्फा लांबच लांब वाहनांच्या रांगा (Pune Mumbai National Highway Long Traffic) लागल्या आहेत. पुढे कार्ला फाटा या ठिकाणी देखील मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. आठवडाभरापूर्वी लोणावळ्यात पावसाने जोरदार हजेरी लावत नंतर पुन्हा दडी मारल्याने सध्या मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. भुशी धरणामध्ये अद्याप अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे भुशी धरणाच्या परिसरात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना कोरड्या पायऱ्यांचे दर्शन घेऊन पुन्हा माघारी फिरावे लागत आहे. लायन्स पॉईंट परिसरात देखील पर्यटक जात आहेत मात्र पाऊस नसल्याने तेथे देखील जास्त वेळ न थांबता पर्यटक वाहने पुन्हा माघारी फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मावळ माझा न्युज चा व्हॉटसअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा 

      मागील आठवड्यात मान्सून ने लोणावळा शहरात जोरदार एन्ट्री केली होती. घाट माथ्यावर मान्सून सक्रिय झाला अशा स्वरूपाच्या चित्र असताना पावसाने पुन्हा दडी मारली आहे. यामुळे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरातील सर्व धबधबे अद्याप कोरडे पडले आहेत. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा यामुळे मोठा हिरमोड होत आहे. सकाळी व संध्याकाळी लोणावळा खंडाळा परिसरात समाधानकारक गारवा निर्माण होत असल्याने या वातावरणाचा मात्र आनंद पर्यटकांना घेता येत आहे. लोणावळा शहरातील लायन्स पॉईंट, तुंगार्ली धरण, खंडाळा येथील राजमाची गार्डन, सनसेट पॉईंट, बाळूमामा या ठिकाणी पर्यटक गर्दी करत आहेत. कार्ला गडावरील आई एकवीरा देवी मंदिर व कार्ला लेणी परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक येत असल्याने कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

मावळ माझा न्युज चा व्हॉटसअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा 

     लोणावळा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लोणावळा शहर पोलीस शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र वाहनांची संख्या जास्त असल्याने व पर्यटक जागा दिसेल त्या ठिकाणी वाहने उभे करण्याचा प्रयत्न करत असल्याने सदरची कोंडी सोडवण्यासाठी रात्र होत आहे. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाकडून अधिकचा बंदोबस्त लोणावळ्यात देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक चौकामध्ये पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पर्यटकांनी देखील लोणावळा शहरात आल्यानंतर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. वाहतुकीला अडथळा होईल अशा प्रकारे रस्त्यावर वाहने उभी करू नयेत. अन्यथा त्यांच्यावर ई चलन मशीन व टोइंग यांच्या माध्यमातून सक्त कारवाई केली जाणार आहे. मागील दोन दिवस वाहतूक नियोजनासाठी लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सुहास जगताप व ग्रामीण भागामध्ये लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह सर्व दुय्यम अधिकारी व पोलीस कर्मचारी, वार्डन, होमगार्ड हे सक्रिय आहेत. पावसाळा सुरू होताच लोणावळा शहर व ग्रामीण भागामधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागल्याने स्थानिक नागरिकांना मात्र याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

इतर बातम्या