Breaking news

Maval News : सामान्य माणूस केंद्रबिंदू माणून शिवसेनेचे कार्य करा -जिल्हा संघटक ॲड.अविनाश रहाणे

तळेगाव दाभाडे : कोणी आपले प्रश्न घेऊन कार्यालयात येईल याची वाट न पाहता शिवसेना सदस्य नोंदणी व मतदार नोंदणी च्या माध्यमातून घरोघरी जा. सर्वसामान्य माणसाचे खुप छोटे छोटे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी वेळोवेळी आवाज उठवा आंदोलने करा. संघर्षाचे दुसरे नाव शिवसेना आहे. असे मनोगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा स॑घटक ॲड. अविनाश रहाणे यांनी व्यक्त केले. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे आयोजित शिवसेना सदस्य नोंदणी अभियान व पदाधिकारी मुलाखत कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. तळेगाव दाभाडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सिद्धनाथ नलावडे व देवा खरटमल यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, महिला आघाडी जिल्हा संघटक शैलाताई खंडागळे, तालुका संघटिका अनिता ताई गोणते, तळेगाव माजी शहरप्रमुख राजेंद्र नवले, संगिताताई सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन विभागप्रमुख उमेश गावडे यांनी केले. जुन्या नव्या सर्व शिवसैनिकांनी दर दोन वर्षांनी घेण्यात येणाऱ्या सदस्य नोंदणी अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी श्री. रहाणे यांनी केले. उपक्रमास तळेगावातील नागरीकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. आंबेगाव तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे माजी चेअरमन राजु सोमवंशी, माजी नगरसेवक खंडु टकले यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.

इतर बातम्या