Breaking news

Maval News : पीडीडीसी बँक सेवक पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी चंद्रकांत ढोरे

वडगाव मावळ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवक सहकारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी वडगाव मावळ येथील चंद्रकांत ढोरे यांची बिनविरोध निवड झाली.

     पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली, या निवडणुकीत सहकार परिवर्तन पॅनल व स्वामी समर्थ सहकार पॅनल मध्ये लढत झाली. मावळ गटातून सहकार परिवर्तन चे उमेदवार म्हणून चंद्रकांत ढोरे हे स्वामी समर्थ पॅनेलचे उमेदवार गुलाबराव खांदवे यांचा 82 मतांनी पराभव करून विजयी झाले होते.

     दरम्यान, संस्थेच्या नुकत्याच झालेल्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीत चेअरमन पदी निलेश थोरात यांची तर व्हाईस चेअरमन पदी चंद्रकांत ढोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चंद्रकांत ढोरे हे जिल्हा बँकेच्या वडगाव मावळ शाखेत सेवेत असून श्री पोटोबा महाराज देवस्थानचे विश्वस्त म्हणून ते कार्यरत आहेत.

इतर बातम्या