Breaking news

Ekvira Devi Yatra : सोमवारी 15 एप्रिल रोजी आई एकविरेच्या गडावर रंगणार पालखी मिरवणुकीचा भव्य सोहळा

लोणावळा : तमाम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकवीरा देवीचा चैत्र पालखी सोहळा येत्या 15 एप्रिल रोजी कार्ला वेहेरगाव गडावर रंगणार आहे. पालखी मिरवणुकीची व यात्रेची सर्व तयारी श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. 

    रविवारी 14 एप्रिल रोजी आई एकवीरा देवीचे माहेरघर असलेल्या देवघर या ठिकाणी आई एकविरेचा भाऊ काळ भैरवनाथ यांचा पालखी मिरवणूक सोहळा सायंकाळी सात वाजता होणार आहे. कोकण भागातून येणाऱ्या आई एकवीरा देवीच्या पालख्या या देवघरांमध्ये येऊन काळ भैरवाची भेट घेत त्या ठिकाणी वाजत गाजत मिरवणूक काढत वेहेरगाव गडावर जाणार आहेत. 15 एप्रिल रोजी आई एकविरा देवीचा मानाचा पालखी मिरवणुकीचा सोहळा सायंकाळी साडेसहा नंतर गडावर होणार आहे. याकरिता ची सर्व तयारी पूर्ण झाली असून श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने चैत्र यात्रेनिमित्त आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुलभ दर्शनाला प्राधान्य देण्यात आले आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी एकविरा देवीच्या गडावर तसेच पायऱ्या मार्गावर व कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात केला असून अग्रसेन महाराज पॅलेस या ठिकाणी मोठी वाहने लावण्यासाठी वाहन तळ्याचे सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच जागोजागी वाहने उभे करण्यासाठी वाहन तळे तयार केली आहेत. कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान मार्गावर कोठेही वाहतूक कोंडी होणार नाही तसेच येणाऱ्या भाविकांना व पालखी घेऊन येणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. 

    आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी गडावर फटाके व वाद्यकाम करणारी वाद्ये घेऊन जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे आई एकवीरा देवीच्या पालखीचे मानकरी तसेच श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ यांच्या बैठका देखील लोणावळा शहर पोलीस स्टेशन व मावळ तहसील कार्यालय या ठिकाणी झाले आहेत योग्य त्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या असून यात्रा काळामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही तसेच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी असे देखील आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. देवस्थानचे विश्वस्त मारुती देशमुख, संजय गोविलकर, नवनाथ देशमुख, सागर देवकर, विकास पडवळ, महेंद्र देशमुख, वर्षा मावकर यांच्याकडून यात्रेची तयारी करण्यात आली आहे.

इतर बातम्या

महागाई व बेरोजगारीने त्रस्त झालेले सर्वसामान्य नागरिक आपल्याला मतदान करणार नाही याची खात्री पटल्याने भाजपाने राज्यात सर्वत्र फोडाफोडीचे राजकारण केले - निखिल कवीश्वर