Breaking news

Expressway Breaking News : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी आज पुन्हा ब्लॉक घेतले जाणार; वाहनांची संख्या वाढल्याने घाटात कोंडी

लोणावळा : आज शुक्रवारी बुद्ध पौर्णिमेच्या सुट्टीला जोडून शनिवार व रविवार असा लॉंग वीकेंड आल्यामुळे, सकाळपासूनच मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पुणे लेनवर वाहनांची संख्या वाढली आहे. घाट परिसरामध्ये वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे. सदरचे कोंडी नियंत्रणात राखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी खंडाळा घाट ते बोगदा परिसरामध्ये साधारणतः दहा दहा मिनिटांचे ब्लॉक घेत ही वाहतूक कोंडी सोडवत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सकाळपासूनच प्रयत्न सुरू केले आहे. मागील आठवड्यात देखील सलग सुट्ट्या मुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली होती या वीकेंडला देखील वाहनांची संख्या मोठी राहणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व वाहन चालकांना लवकरात लवकर घाट क्षेत्रामधून पुढे जाता यावे याकरिता महामार्ग पोलिसांनी ॲक्शन प्लॅन तयार केला असून सकाळपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे अवजड वाहनांना देखील मार्गावर बंदी घालण्यात आली आहे.

याविषयी बोलताना बोरघाट महामार्ग पोलीस म्हणाले, मुंबई पुणे मार्गिकेवर वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने km 39 ते km 45/500 पर्यंत वाहतूक संत गतीने चालू आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी km 44/100 ते खंडाळा टनेल या दरम्यान 10/10 मिनिंटांचा ब्लॉक घेऊन पुणे वाहिनीवरील वाहने मुंबई वहिनी थांबवून विरुद्ध दिशेने काढून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. योग्य तो बंदोबस्त लावण्यात आला आहे. वाहन चालकांनी सहकार्य करावे. एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग पोलीस आयआरबी, डेल्टा फोर्स, एमएसआरडीसी, मसुब कर्मचारी आदी शासकीय यंत्रणांच्या सोबत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते व सजग नागरिक प्रयत्न करत आहेत. वाहन चालकांनी देखील वाहतूक कोंडीत वाहने सोडून पुढे घेऊन जाऊ नयेत लेनची शिस्त पाळत यंत्रणांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्या