Breaking news

नांगरगावात श्री स्वामी समर्थ व गॅलेक्सी सिटी सोसायटी समोरील रस्ता काँक्रिटीकरण कामांचा शुभारंभ

लोणावळा : नांगरगावातील श्री स्वामी समर्थ व गॅलेक्सी सिटी सोसायटीकडे जाणार्‍या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आज नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. 

    यावेळी ज्येष्ठ नगरसेवक श्रीधर पुजारी, नांगरगाव विभागाचे नगरसेवक सुनिलनाना इंगूळकर, जयश्री आहेर, माजी उपनगराध्यक्षा रंजना दुर्गे, सुरेश गायकवाड, रामचंद्र दुर्गे पाटील, शिक्षण समितीचे माजी उपसभापती प्रदिप थत्ते, गंगाराम मावकर, सुनिल गायकवाड, सुधिर पिंगळे, किरण सोनवणे, नगरपरिषद ठेकेदार दत्तामामा चव्हाण व संतोष तारे, अंकूश खिल्लारे, मारुती आहेर, सचिन साठे यांच्यासह दोन्ही सोसायट्यांमधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    लोणावळा शहरातील बहुतांश रस्ते मागील पंचवार्षिक काळात पुर्ण झाले असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी यावेळी सांगितले. तसेच नांगरगाव परिसरातील जवळपास सर्वच रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहेत. नागरिकांना मार्गदर्शन करताना सुरेखाताई म्हणाल्या लोणावळा शहराने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात दुसरा क्रमांक मिळविला आहे. आता आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. शहराला कायमस्वरूपी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी आपला सोसायट्यांचा परिसर स्वच्छ ठेवावा, कोणी उघड्यावर कचरा टाकताना आढळल्यास त्याला तात्काळ रोखा, घरोघरचा कचरा हा घंटागाडीमध्ये वेगवेगळा करून द्या असे आवाहन केले.

    यावेळी शहरात मागील पाच वर्षात विकासाभिमूख कामे करत शहराचा नावलौकिक देशपातळीवर वाढविल्याबद्दल माजी उपनगराध्यक्षा रंजना दुर्गे, रामचंद्र दुर्गे, सुरेश गायकवाड आदींच्या हस्ते नगराध्यक्षा व सर्व उपस्थित नगरसेवकांचा पुष्पगुच्छ देऊन दोन्ही सोसायट्या व नांगरगाव ग्रामस्तांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

इतर बातम्या