Breaking news

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी जागतीक शरीर सौष्टव स्पर्धेत पटकवले ब्राँझ मेडल

खोपोली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष शंकर पुजारी हे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पळस्पे या ठिकाणी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. पोलीस दलात आपली सेवा करत असताना, त्यांनी शरीर सौष्ठव हा छंद जोपासला आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आशियायी स्तरावर त्यानी अनेक मेडल प्राप्त केले आहेत. प्रथमच त्यांनी जागतिक पातळीवर ताश्कंद येथील उज्बेकिस्तान याठिकाणी संपन्न झालेल्या बाराव्या वर्ल्ड बॉडी बिल्डिंग व फिजिक चॅम्पियनशिप 2021 स्पर्धेत भाग घेतला. 36 देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारतातील पुरुष व महिला अशा 60 खेळाडूं पैकी महाराष्ट्रातील 6 खेळाडू स्पर्धेत उतरले होते.

   सुभाष शंकर पुजारी यांनी 80 किलो वजन गटाच्या शरीर सौष्टव स्पर्धेत भाग घेऊन अटीतटीच्या स्पर्धेत त्यांनी अंतिम फेरी गाठली होती, परंतू त्यांना ब्राँझ मेडलवर समाधान मानावे लागले. 

  पोलिस सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुभाष शंकर पुजारी यांनी संपादन केलेला हा बहुमान पोलीस दलासाठी अभिमानास्पद असल्याने त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

इतर बातम्या