गौतमी पाटीलच्या त्या व्हिडिओ वायरल प्रकरणी एकाला जामीन मंजुर; आरोपीतर्फे ॲड. सुरज शिंदे यांचा युक्तिवाद

मावळ माझा न्युज : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा अश्लील व्हिडिओ काढून तो व्हिडिओ फेक इंस्टाग्राम अकाउंट वरून व्हायरल केल्या प्रकारणी एका अल्पवयीन मुलाला अहमदनगर येथून विमानतळ पोलिस स्टेशन ने ताब्यात घेतली होते. तो अल्पवयीन असल्याने त्याला जुवेनाईल कोर्टासमोर हजर केल्यानंतर काही दिवसांच्या कोठडीनंतर आज कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आहे.
सदर अहमदनगर येथून ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाने ॲड. सुरज संजय शिंदे यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. अल्पवयीन मुलाच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करीत मे. जुवेनाईल कोर्टाने त्याला योग्य त्या अटी व शर्तीवर जामीन मुक्त करण्याचा आदेश दिला असल्याचे अँड. सुरज शिंदे यांनी सांगितले. नृत्यांगना गौतमी पाटील हिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्या प्रकरणी तिची सहाय्यक मोनिका धुमाळ हिने विमानतळ पोलीस स्टेशन येथे फेब्रुवारी 2023 मध्ये गुन्हा दाखल केला होता