VPS Alumni get together : 29 जानेवारी रोजी लोणावळ्यातील VPS शाळेत भरणार माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

लोणावळा : मागील शंभर वर्षांमध्ये लाखो विद्यार्थी घडविणाऱ्या लोणावळ्यातील व्हीपीएस (VPS) या शाळेमध्ये 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा होणार आहे. 1932 ते 2022 या कालावधीमधील माजी विद्यार्थी या स्नेह मेळाव्यात सहभागी होणार आहेत. विद्या प्रसारणी सभा ही संस्था यावर्षी 100 वर्षांची होत आहे.
मावळ तालुक्यातील बातम्यांच्या अपडेटसाठी आजच मावळ माझा न्युज ग्रुप जाॅईन करा
या संस्थेने लोणावळा व आजूबाजूच्या भागातील मुलांना शिक्षणाची सोय व्हावी याकरिता त्याकाळी लहानशी शाळा लोणावळा शहरात सुरू केली. आज या शाळेमध्ये काही हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. लोणावळा शहरांमधील जुनी व सर्वात मोठी शाळा असणाऱ्या व्हीपीएस या शाळेने आज पर्यंत लाखो विद्यार्थी घडविले आहेत. यापैकी अनेक जण देश विदेशामध्ये मोठ मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.
मावळ तालुक्यातील बातम्यांच्या अपडेटसाठी आजच मावळ माझा न्युज ग्रुप जाॅईन करा
संस्थेच्या शंभरीचे निमित्त साधत या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र करत शाळेमध्ये स्नेह मेळावा आयोजित करण्याचा संकल्प सोशल मीडियाच्या माध्यमातून लोणावळ्यात काही माजी विद्यार्थ्यांनी केला. त्यादृष्टीने वाटचाल केली व सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक माजी विद्यार्थी यामध्ये जोडले गेले. लोणावळा शहरात राहणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी या स्नेह मेळाव्याच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला व संकल्पना प्रत्यक्षात आणण्याकरिता 29 जानेवारी हा दिवस निश्चित करत स्नेह मेळाव्याचे आयोजन केले.
या मेळाव्यामध्ये साधारणतः दीड हजार माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. तर अनेक जण थेट शाळेमध्ये येणार आहेत. यानिमित्ताने अनेक वर्ष एकमेकांना न भेटलेल्या मित्रांची भेट होणार आहे. सोबतच ज्यांनी आपल्याला शिकवले घडविले अशा गुरुजनांचे आशीर्वाद घेता येणार आहेत. 1932 ते आज पर्यंत हयात असलेल्या शिक्षकांना या स्नेहमेळाव्यानिमित्त गौरविण्यात येणार आहे. 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता हा स्नेह मेळावा सुरू होईल. सुरुवातीला विद्यार्थी नोंदणी, दहावीच्या बॅच नुसार आसन व्यवस्था, दुपारचे जेवण व तदनंतर मुख्य सत्कार सन्मान सोहळा व शिक्षक विद्यार्थी मनोगते होणार आहेत. तरी जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी या स्नेह मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन माजी विद्यार्थी यांनी केले आहे.